कोल्हापूर : शहरात वाहनांना ‘येथे’ प्रवेश बंद

कोल्हापूर : शहरात वाहनांना ‘येथे’ प्रवेश बंद
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी कुंभारवाड्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शाहूपुरी, पापाची तिकटी व बापट कॅम्प कुंभार गल्ली येथील मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांनी पर्यायी पार्किंगचा अवलंब करून गर्दी टाळावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

शाहूपुरी कुंभार गल्‍ली :

शाहूपुरी कुंभार गल्‍लीमध्ये जाणार्‍या वाहनांना नाईक अँड नाईक कंपनीसमोर प्रवेश बंद करण्यात येत आहे. फोर्ड कॉर्नर व उमा टॉकिजच्या दिशेने शाहूपुरी कुंभार गल्‍लीमध्ये जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना रिलायन्स मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पार्वती सिग्‍नल चौक व उमा टॉकिजच्या दिशेने येऊन शाहूपुरी कुंभार गल्‍लीमध्ये जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. गवत मंडई चौकातून पुढेही प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पापाची तिकटी (गंगावेस) कुंभार गल्‍ली :

पापाची तिकटी ते बुरूड गल्‍लीकडे जाणार्‍या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
शाहू उद्यान गंगावेस ते कुंभार गल्‍लीकडे जाणार्‍या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना शाहू उद्यानपासून पुढे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
गंगावेस चौक ते पापाची तिकटी ते माळकर चौक या मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

बापट कॅम्प कुंभार गल्‍ली 

शिरोली टोल नाका ते बापट कॅम्पकडे जाणार्‍या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने मार्केट यार्ड चौक येथून जाधववाडीमार्गे पुढे मार्गस्थ होतील. शाहू मार्केट यार्डसमोरून बापट कॅम्प कुंभार गल्‍लीमध्ये आत जाणारी वाहने परत त्याच मार्गाने न येता सर्व वाहने रिव्हरसाईड होंडा शोरूमजवळच्या रस्त्याने मार्गस्थ होतील.

बापट कॅम्प कुंभार गल्‍ली

प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, शाळा क्र. 32 जाधववाडी, ओम कॉम्प्लेक्ससमोरील रिकम्या जागेत वाहने उभी करावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news