नियोजन मंडळातून जिल्ह्याला दहीहंडीसाठी 10 लाख निधी : राजेश क्षीरसागर | पुढारी

नियोजन मंडळातून जिल्ह्याला दहीहंडीसाठी 10 लाख निधी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नियोजन मंडळातून पुढील वर्षापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला दहीहंडीसाठी 10 लाखांचा निधी देऊ. त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला हा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवी दहीहंडी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम आदी निर्बंधमुक्त केले आहेत. दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी राज्य नियोजन मंडळातूनही हा निधी दिला जाईल. जिल्हा नियोजन समिती त्या-त्या जिल्ह्यातील दहीहंडी मंडळांना हा निधी देईल.

खा. माने म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयामुळे मराठमोळे सण-उत्सव जोमाने साजरे होत आहेत. राजेश क्षीरसागर यांच्या पाठिंब्याने कोल्हापुरातही हे उत्सव ताकदीने साजरे होतील. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, शिवाजीराव जाधव, जयवंत हारुगले उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष राहुल अपराध यांनी स्वागत केले. शिवसेना शाखाप्रमुख कपिल केसरकर यांनी आभार मानले.

Back to top button