वारणेच्या ऊर्जांकुर सहवीज निर्मिती प्रकल्पात नवचंडी यज्ञ उत्साहात | पुढारी

वारणेच्या ऊर्जांकुर सहवीज निर्मिती प्रकल्पात नवचंडी यज्ञ उत्साहात

वारणानगर ; पुढारी वृत्तसेवा : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या ऊर्जांकूर सहवीज निर्मिती प्रकल्पावर नवचंडी यज्ञ विविध धार्मिक विधींनी पार पडला. यावेळी कारखान्याच्या सुमारे 25 हजारांवर सभासदांनी सुरूचि भोजनाचा आस्वाद घेतला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जांकुर प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली.

वारणा समूहाचे नेते आ. डॉ. विनय कोरे व त्यांची पत्नी शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते यज्ञ व धार्मिक विधी पार पडले. यावेळी वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, स्नेहा कोरे, विश्वेश कोरे, ईशानी कोरे, जोतिरादित्य कोरे आदी उपस्थित होते.

डॉ. विनय कोरे म्हणाले, बगॅसपासून सहवीज निर्मिती करणारा हा राज्यातील सर्वात मोठा 44 मेगावॅटचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प कारखाना सभासदांच्या मालकीचा होत असताना तो आज सुमारे 8 कोटी रुपये गुंतवणुकीचा झाला असून वारणा साखर कारखान्याला प्रतिवर्षी सुमारे 100 कोटी रुपये मिळणार असल्यामुळे जादा दर देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक शहाजी भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस्थापक शरद महाजन, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने व वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सभासद, वाहतूक, कंत्राटदार उपस्थित होते.

Back to top button