कोल्हापूर : पुराच्या पाण्यातून तिरंगा ध्वज घेऊन पोहण्याचा उपक्रम | पुढारी

कोल्हापूर : पुराच्या पाण्यातून तिरंगा ध्वज घेऊन पोहण्याचा उपक्रम

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे.
या यानिमित्त जनजागृतीसाठी राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने शिवाजी पूल ते राजाराम बंधारा असा पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यातून तिरंगा ध्वज घेऊन पोहण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात लहान जलतरणपटू यशराज माने (वय १२) याचा सहभाग होता. ग्रुपच्या वतीने ४.५ कि. मी. चे अंतर अवघ्या ३० मी. पार करण्यात आले.

ग्रुपचे सदस्य कविराज राजदीप, शिवाजी ठाणेकर, किरण पाटील, प्रज्वल केंबळे, आदित्य जासुद, प्रतिक सुतार, ओमकार म्हाकवे, अस्मिता म्हाकवे, शेखर शेणवी, धीरज मारे, विनायक आळवेकर, रावसाहेब शिंदे, सुर्यकांत सुतार, नितीन माने, संजय जासुद, गणेश उलपे व जितू केंबळे यांनी सहभाग घेतला. बावडा रेस्क्यूच्या वतीने या ग्रुपचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button