‘इतिहास पक्का तो हुकमी एक्का’ कॉन्टेस्टमध्ये 200 हेल्मेट जिंकण्याची संधी | पुढारी

‘इतिहास पक्का तो हुकमी एक्का’ कॉन्टेस्टमध्ये 200 हेल्मेट जिंकण्याची संधी

कोल्हापूर : यंदा देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणचेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने टोमॅटो एफ.एम., आरटीओ-कोल्हापूर, बँक ऑफ महाराष्ट्र आणि मोटार व्हेईकल डिलर असोसिएशन (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो एफ.एम.वर 15 आणि 16 ऑगस्ट रोजी हेल्मेेट जनजागृती अभियानांतर्गत ‘इतिहास पक्का तो हुकमी एक्का’ या कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. जेव्हा आपण दुचाकीवरून प्रवास करत असतो, तेव्हा सर्वात महत्त्वाची असते ती सुरक्षा आणि या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे ते हेल्मेट. म्हणूनच प्रत्येक जण या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन स्वत:ला सुरक्षित बनवू शकतो. कारण, यंदा या कॉन्टेस्टमध्ये 200 हेल्मेट जिंकण्याची संधी आहे.

या कॉन्टेस्टमध्ये आर.जे. तुम्हाला भारतीय स्वातंत्र्यलढा आणि रस्ते सुरक्षा यावरील विविध प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरे देऊन हेल्मेट जिंकण्याची संधी सहभागी स्पर्धकांना असणार आहे. ‘इतिहास पक्का तो हुकमी एक्का’ कॉन्टेस्ट सकाळी 8 पासून रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. प्रश्नांची उत्तरे येत असल्यास तुम्ही तुमची उत्तरे नाव आणि पत्ता टाईप करून 9763943943 या नंबरवर एसएमएस करावयाची आहेत.

यामध्ये लकी विजेत्यांना हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. तरी भविष्यातील सुरक्षित प्रवासासाठी ‘इतिहास पक्का तो हुकमी एक्का’ या कॉन्टेस्टमध्ये भाग घ्या आणि हेल्मेट जिंका.

Back to top button