पन्हाळ्यावर ३७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह कोल्हापूर हायकर्सची रॅली | पुढारी

पन्हाळ्यावर ३७५ फूट लांबीच्या तिरंग्यासह कोल्हापूर हायकर्सची रॅली

पन्हाळा पुढारी वृत्तसेवा : भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या समर्थनार्थ ३७५ फूट लांब तिरंगा ध्वजाची पन्हाळ्यावर रॅली काढण्यात आली. कोल्हापूर हायकर्स, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर, व पन्हाळा नगरपरिषद, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ८ वाजता बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली.

विद्यार्थी व नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत दोनशेहून अधिक विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. ही पदयात्रा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून ते राजदिंडी मार्गा पर्यंत झाली. या पदयात्रेनंतर सहभागी विद्यार्थी व नागरिक पन्हाळा ते पावनखिंड या साहस यात्रेला रवाना झाले. अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून साहस यात्रेला सुरुवात झाली.

कोल्हापूर हायकर्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 375 फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रे अंतर्गत कोल्हापूर हायकर्स, सेंट झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर, नरके पब्लिक स्कूल पन्हाळा , संजीवनी पब्लिक स्कूल पन्हाळा, गडवाट , रायगड प्लेस टू प्लेस या संस्था सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमास पन्हाळा मुख्याधिकारी सौ. स्नेहलता कुंभार-ढेरे, माजी नगराध्यक्ष सौ. रुपाली धडेल, कोल्हापूर हायकर्सचे संचालक सागर पाटील, डॉ. गजानन पाटील (शाहूवाडी ), अभिनेत्री सोनाली पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे, प्रांताधिकारी बी. आर. माळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button