इचलकरंजी : महावितरणच्या सहायक अभियंत्यासह दोघांना मारहाण | पुढारी

इचलकरंजी : महावितरणच्या सहायक अभियंत्यासह दोघांना मारहाण

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या सहायक अभियंता व कर्मचार्‍यास धक्‍काबुक्‍की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बंडू प्रकाश शेख (वय 29) व मुन्‍ना जाधव (पूर्ण नाव समजू शकले नाही, दोघे रा. गोसावी गल्‍ली, इचलकरंजी) या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली.

सहायक अभियंता मोहन प्रभाकर कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. बंडू शेख याचे वीज बिल थकीत होते. वसुलीसाठी कर्मचारी युवराज माळी गेले होते. वीज बिल भरण्यास सांगितले असता शेख याने बिल भरणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार समजताच कोळेकर यांनी तातडीने धाव घेतली. त्यावेळी बंडू शेख व त्याचा साथीदार मुन्‍ना जाधव या दोघांनी वीज बिल भरणार नाही असे म्हणत कोळेकर व माळी यांना पुन्हा धक्‍काबुक्‍की करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button