स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : स्मारके, पुतळ्यांवर आजपासून विद्युत रोषणाई | पुढारी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : स्मारके, पुतळ्यांवर आजपासून विद्युत रोषणाई

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरातील स्मारके, पुतळे आणि महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सलग तीन दिवस ही रोषणाई राहणार आहे. महापालिका इमारतीसह शहरातील 14 ठिकाणांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात 44 हजार तिरंगा ध्वज वितरित करण्यात आले आहेत. महापालिकेने 27 हजार ध्वज घेतले होते. त्यातील 10 हजार ध्वज चेंबर ऑफ कॉमर्सला देण्यात आले. त्यांच्या वतीने शहरातील व्यापारी व इतर संस्थांना देण्यात आले. महापालिकेच्या 5 हजार कर्मचार्‍यांनाही ध्वज दिले आहेत. त्याबरोबरच शहरातील शाळांना ध्वज दिले आहेत. दारिद्य्ररेषेखालील 9 हजार कुटुंबांनाही मोफत ध्वज देण्यात आले आहेत.

Back to top button