कोल्हापूर: गडहिंग्लजला दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉलचा किक ऑफ | पुढारी

कोल्हापूर: गडहिंग्लजला दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉलचा किक ऑफ

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नव्हत्या. मात्र, आता या स्पर्धा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय युनायटेडच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

विटा : फसवणूक झालेल्या १५ द्राक्ष बागायतदारांचे ४७ लाख मिळाले परत

स्पर्धेचे यंदाचे हे सतरावे वर्ष आहे. यावर्षी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध हटल्याने दिवाळीत या स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. वाढलेली महागाई लक्षात घेता स्पर्धेच्या खर्चात सुमारे २० टक्के वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. परराज्यातील संघांचा सहभाग लक्षात घेता स्पर्धेसाठी यंदा बक्षीस रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण अडीच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रवास, निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्थेविषयी या बैठकीतही चर्चा करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button