कोल्हापूर : कळे – बाजारभोगाव मार्गावर ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्यास वाचविले | पुढारी

कोल्हापूर : कळे - बाजारभोगाव मार्गावर ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्यास वाचविले

कळे : पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील कळे-बाजारभोगाव मार्गावर काटेभोगाव येथील ओढ्यावरील पुलामध्ये कचरा अडकल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. हे पाणी रत्यावर तुंबून वाहतूक काही काळ विस्कळित झाली. आज, सोमवारी (दि. ८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या पाण्यातून साळवाडी येथील दुचाकीस्वार कळेकडे गॅस सिलिंडर आणण्यासाठी निघाला असता काही अंतरावर गाडीसह वाहून गेला. यावेळी तेथील नागरिकांनी ताबडतोब त्याला दुचाकीसह बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

काटेभोगावचे सरपंच रवींद्र पाटील यांनी तातडीने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यातील कचरा काढला व त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेतील व्यक्तीचे अद्याप नाव समजू शकलेले नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button