कोल्हापूर जिल्ह्यातील 468 पोस्टांत तिरंगा ध्वज उपलब्ध | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील 468 पोस्टांत तिरंगा ध्वज उपलब्ध

कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम देशभर राबविण्यात येत आहे. यामध्ये आता पोस्ट खात्यानेही पुढाकार घेतला आहे. 2 फूट बाय 3 फूट आकारातील कापडी राष्ट्रध्वज जिल्ह्यातील सर्व 468 पोस्टांत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच घरपोेच करण्याचीही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.

पोस्टामध्ये केवळ 25 रुपये प्रतिनग या किमतीत ध्वज उपलब्ध करण्यात आले आहेत. विक्री सुरू करण्यात आली असून, घरपोच सुविधाही देण्यात येत आहे. तसेच जनजागृती, प्रबोधन यासाठी प्रभात फेरी, शाळा, महाविद्यालयांना भेटी, असेही उपक्रम राबविण्यात येत आहेत. पत्रकार परिषदेला सहायक डाकअधीक्षक निलोफर शेख, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Back to top button