Pansare Murder Case : पानसरे खून खटल्यावर २३ ऑगस्टला सुनावणी

Pansare Murder Case : पानसरे खून खटल्यावर २३ ऑगस्टला सुनावणी
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गोविंद पानसरे (Pansare Murder Case) खून खटल्यावर पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. डॉ. वीरेंद्र तावडेसह १० आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहेत. यावेळी आरोपीवर दोष निश्चिती केली जाणार असून सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे आणि आरोपीच्या वतीने अॅड समीर पटवर्धन काम पाहणार आहेत.

(Pansare Murder Case) ज्‍येष्‍ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येचा तपास महाराष्‍ट्र दहशतवाद विराेधी पथककडे ( एटीएस ) सोपण्‍यात यावा, असा आदेश ३ ऑगस्ट रोजी उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या 'एसआयटी'च्‍या अधिकार्‍यांनीही  'एटीएस'ला तपासकार्यात सहकार्य करावे, असेही  न्‍यायालयाने या वेळी स्‍पष्‍ट केले आहे.

पानसरे हत्‍येचा तपास सीआयडीच्‍या विशेष तपास पथक ( एसआयटी ) करत आहे. मात्र गेली सात वर्षांहून अधिक काळ झाला तरी मारेकरी हाती लागलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाचा तपास 'एटीएस'कडे सोपविण्‍यात यावा, अशी मागणी असणारी याचिका पानसरे कुटुंबियांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती.

यावर उच्‍च न्‍यायालयाच्‍या दोन सदस्‍यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी एटीएसकडे तपास सोपविण्‍यास आमची हरकत नाही, असे सीआयडीच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील अशोक मुंदरगी यांनी काल झालेल्‍या सुनावणीवेळी स्‍पष्‍ट केले होते. यानंतर पानसरे कुटुंबीयांची मागणी मान्‍य करत न्‍यायालयाने तपास एटीएसकडे वर्ग करण्‍याचा आदेश दिला होता.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news