कोल्हापूर : शाहू महाराज समाधीचा निधी स्थगित; शिवसेनेचा कोल्हापूर बंदचा इशारा

कोल्हापूर : शाहू महाराज समाधीचा निधी स्थगित; शिवसेनेचा कोल्हापूर बंदचा इशारा
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू समाधी स्मारकाचा निधी शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरात आज (दि.५) भर पावसात 'स्वाभिमानी जनतेचा, स्वाभिमानी निधी संकलन' आंदोलन करण्यात आले.

यावेळी जनतेतून निधी संकलन करण्यात आले. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, सुनील मोदी, मंजित माने, आदीसह महिला व शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news