कोल्हापूर : व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवत कॉलेज तरुणाची आत्महत्या | पुढारी

कोल्हापूर : व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवत कॉलेज तरुणाची आत्महत्या

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सिद्धार्थ सुभाष जाधव (वय 19) या महाविद्यालयीन तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

सिद्धार्थने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button