राज्यस्तरिय महिला फुटबॉल स्पर्धा : गोंदिया संघाला नमवत कोल्हापूरचा संघ उपांत्य फेरीत | पुढारी

राज्यस्तरिय महिला फुटबॉल स्पर्धा : गोंदिया संघाला नमवत कोल्हापूरचा संघ उपांत्य फेरीत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ; वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने महाराष्ट्रराज्य आंतरजिल्हा महिला (खुला गट) फुटबॉल चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा पालघर येथे सुरू आहे. या सर्प्धेत बुधवारी कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाचा सामना गोंदिया जिल्हा फुटबॉल संघाबरोबर झाला. हा सामना कोल्हापूर जिल्हा संघाने 3-0 गोलफरकाने जिंकला. हा सामना 35-35 मिनिटांचा खेळवण्यात झाला.(KSA)

कोल्हापूर संघाच्या सानिका पाटीलने 19 व्या मिनिटाला प्रतिक्षा मिठारीच्या पासवर गोल करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. कोल्हापूरची समृद्धी कटकोळे हिला गोंदिया संघाच्या खेळाडूने मोठ्या डी मध्ये चुकीच्या पध्दतीने अडविल्याबद्दल पंचांनी कोल्हापूर संघाला पेनल्टी बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत कोल्हापूरच्या वैष्णवी डोमलेने पेनल्टीवर 32 व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.(KSA)

सामन्याच्या मध्यांतरानंतर सानिका पाटीलने 68 व्या मिनिटाला आर्या मोरेच्या पासवर वैयक्तिक दुसरा व संघासाठी गोल नोंदवून संघास 3-0 अशा विजयी आघाडीवर नेहले. सामन्याच्या अखेरपर्यंत हिच आघाडी कायम राहिल्याने हा सामना कोल्हापूर जिल्हा संघाने 3-0 गोलफरकाने जिंकला.

कोल्हापूर संघाची खेळाडू सानिका पाटील व समृद्धी कटकोळे यांनी आघाडी फळीत तर आर्या मोरे व प्रणाली चव्हाण यांनी मध्यम फळीत व मृणाल खोत व रिया बोळके यांनी बचाव फळीत उत्कृष्ट खेळ करून विरूद्ध संघांतील खेळाडूंना रोखून ठेवले. संघाचे मार्गदर्शक म्हणून अमित साळोखे व पृथ्वी गायकवाड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. उपांत्य सामना दि.05-08-2022 रोजी सकाळी 10:00 वाजता पुणे/पालघर जिल्हा संघाबरोबर होणार आहे.

Back to top button