कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुस्तकातून मोबाईल | पुढारी

कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुस्तकातून मोबाईल

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात आलेल्या स्पीड पोस्टाच्या तपासणीत पुस्तकातून आलेला मोबाईल, बॅटरी व चार्जर सापडला. सोमवारीच तपासणीत गांजासद़ृश पाला मिळून आल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशीही असाच प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुभाष संतोष वाघमोडे (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कैद्यांना येणारी सर्व पत्रे तपासून पुढे पुढे दिली जातात. सोमवारी तपासणीत एका पाकिटात गांजासद़ृश पाला मिळून आला होता. मंगळवारी जामिनावर सुटलेल्या एका न्यायालयीन बंदीच्या नावे रजिस्टर पोस्टाने एक पुस्तक आले होते. त्यामध्ये मोबाईलसह चार बॅटर्‍या आणि चार्जर सापडले. हे पुस्तक संशयित सुभाष वाघमोडे याने पाठविल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button