जोतिबावरील श्रावण षष्ठी यात्रेची जय्यत तयारी | पुढारी

जोतिबावरील श्रावण षष्ठी यात्रेची जय्यत तयारी

जोतिबा डोंगर ; पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावरील आदिमाया श्री चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेचा आज (दि. 3) पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर श्रावण षष्ठी यात्रा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. यात्रेची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे.

श्रावण षष्ठी यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कार्यरत आहे. पाणी निर्जंतुकीकरण, अत्यावश्यक सेवा व उपचार याची तयारी केली आहे. महावितरणकडून विद्युतवाहिन्या व प्रकाशदिवे यांची चाचणी केली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेची आखणी केली आहे. बुधवारी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असणार आहे. गुरुवारी सकाळी श्रावण षष्ठीचा मुख्य आरती सोहळा होणार आहे. देवस्थान समितीकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडी, कोडोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार डोईजड, देवस्थान इन्चार्ज दीपक म्हेतर, सरपंच राधा बुणे यांनी दर्शन रांगेची पाहणी केली.

वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर : श्रावण षष्ठी यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल करण्?यात आले आहेत. केर्ली ते जोतिबा डोंगर एकेरी मार्ग असणार आहे. वाहनांच्या पार्किंगची 15 ठिकाणी व्यवस्था केल्याचे शहर वाहतूक शाखेच्?या निरीक्षक स्?नेहा गिरी यांनी सांगितले.
एकेरी आणि प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग

सर्व वाहने केर्ली, कुशिरे फाटामार्गे डोंगरावर सोडण्यात येतील. इतर सर्व मार्ग मोटारींसाठी बंद आहेत. घाट उतरताना सर्व चारचाकी वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ किंवा गिरोलीमार्गे सोडण्यात येणार आहेत. जोतिबा डोंगर जुने आंब्याचे झाड या मार्गावरील वाहतूक दोन्ही मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. दानेवाडी, वाघबीळ व शाहूवाडीकडून येणार्‍या वाहनांना केर्लीमार्गे डोंगरावर सोडण्यात येणार आहे. माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

वाहन पार्किंग व्यवस्था

यमाई मंदिर पाठीमागील बाजूस : दुचाकी
यमाई मंदिर दक्षिण बाजूस : चारचाकी
यमाई मंदिर उत्तर बाजूस : चारचाकी
मुख्य पार्किंग : आराम बस, ट्रक, मिनी बस
ग्रामपंचायत पार्किंग (पोलिस चौकीजवळ) : चारचाकी
जुन्या एस.टी. स्टँडसमोर : ट्रक व चारचाकी
जुन्या एस.टी. स्टँडसमोर, हॉटेल द्वारका : दुचाकी
एमटीडीसी वळणावर : चारचाकी
एमटीडीसीसमोर : दुचाकी
तळ्यावरील जागेत : दुचाकी, चारचाकी
पिराची कडा (टोल नाक्यासमोरील रोड) : चारचाकी
नवीन एस.टी. स्टँड आतील बाजूस : चारचाकी
तोरणाई कडा : चारचाकी
नवीन एस.टी. स्टँड पाठीमागील बाजूस : चारचाकी

Back to top button