जिल्ह्यातील 425 कोटींची विकासकामे आता नव्या पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच | पुढारी

जिल्ह्यातील 425 कोटींची विकासकामे आता नव्या पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच

कोल्हापूर : पूर्वीच्या सरकारमध्ये मंजूर करण्यात आलेली कामे सुरू करण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोमवारी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एप्रिलपासून प्रशासकीय मान्यता दिलेली सर्व कामे स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 425 कोटींच्या कामांना नवीन पालकमंत्री आल्यानंतरच सुरुवात होईल, तर दोन कोटींच्या कामांनाही ब्रेक लागला आहे.

नियोजन विभागामार्फत जिल्ह्यातील विकासकामांना राज्य सरकारकडून निधी दिला जातो. जिल्हा नियोजन समिती विभागवार खर्चाचे नियोजन करते. राज्यातील सत्ता बदलानंतर पूर्वीच्या सरकारने घेतलेले काही निर्णय नवीन सरकारने थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वार्षिक खर्चाचा अंदाज घेऊन आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले जातात. जिल्हास्तरीय योजनांसाठी किती निधी द्यायचा, याची मंजुरी जिल्हा नियोजन समिती देत असते. सत्ता बदलामुळे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सदस्यांसह जिल्हा नियोजन समित्यांचीही फेररचना करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 1 एप्रिल 2022 पासून दिलेल्या विविध कामांच्?या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्रात म्हंटले आहे.

हेही वाचा

Back to top button