जिम्नॅस्टिक स्पर्धेत 117 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग | पुढारी

जिम्नॅस्टिक स्पर्धेत 117 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहर परिसर हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने व कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) यांच्या सहकार्याने आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धा उत्साहात झाली.
यात 117 मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांचा सन्मान मेडल व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
छत्रपती शाहू स्टेडियमवरील जिम्नॅस्टिक हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, ‘शाहू मॅरेथॉन’चे प्रताप घोरपडे, धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाचे अधिकारी असिफ शेख, डॉ. अर्जुन पाटील, अनिकेत अष्टेकर यांच्या हस्ते झाला. संयोजन असोसिएशनचे अध्यक्ष व प्रशिक्षक संजय तोरस्कर व सहकार्‍यांनी केले. सर्वांना ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button