कोल्हापूर : हॉटेलात राहणे महागले | पुढारी

कोल्हापूर : हॉटेलात राहणे महागले

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : जीएसटी कौन्सिलच्या नव्या करप्रणालीमुळे हॉटेलमधील राहणे आता महागणार आहे. ज्या हॉटेलमध्ये लॉजचे भाडे 1 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाही आता सरसकट 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. राज्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी याला विरोध दर्शवला आहे.

जीएसटी परिषदेची बैठक नुकतीच चंदिगडमध्ये झाली. या परिषदेमध्ये एक हजार रुपयापर्यंत खोली भाडे असणार्‍या हॉटेल चालकांना 12 टक्के जीएसटी द्यावे लागेल, अशी शिफारस या परिषदेत करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य होऊन त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

पूर्वी ज्या हॉटेलचे खोली भाडे 1 हजार रुपयापेक्षा जास्त होते त्यांना 12 टक्के जीएसटी लागू केला होता. त्याच्या आत भाडे असेल तर जीएसटी आकारणी होत नव्हती. त्यामुळे ठराविक मोठ्या हॉटेलकडूनच कर आकारणी केली जात होती. पण नव्या शिफारशीमुळे लहान लॉजचालकांनाही मोठा फटका बसणार आहे.

कोरोना काळात दोन वर्षे हॉटेल व्यवसाय ठप्प होता. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढत असते. हॉटेलसाठी हा चांगला हंगाम असतो. कोरोना निर्बंध उठल्यामुळे आता कुठे पर्यटकांची गर्दी वाढत आहे तोच जीएसटीची नवी शिफारस हॉटेल व्यवसायिकांची डोकेदुखी ठरत आहे. टेल असोसिएशनच्या बैठका घेतल्या जात असून याला विरोध दर्शवला जात आहे.

Back to top button