कोल्हापूर : टोप संभापूर येथे गव्याचे दर्शन | पुढारी

कोल्हापूर : टोप संभापूर येथे गव्याचे दर्शन

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील चिन्मय गणाधिश गंधर्व येथे गव्याचे दर्शन झाले. यावेळी गवा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

गेले काही दिवस सादळे मादळे, कासारवाडी परिसरात दिसणाऱ्या गव्याचे आज सकाळी टोप संभापूर येथील चिन्मय गणाधीश गंधर्व येथे लोकांना दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज रविवार तसेच विनायक चतुर्थी असल्याने श्री चिन्मय गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांनी गवा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

याबाबत माहिती मिळताच शिरोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच वन आधिकारी आर. एस. कांबळे याच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग हातकणंगलेचे साताप्पा जाधव, करवीर’चे वनपाल विजय पाटील, कृष्णात दळवी, पुंडलीक खाडे (वनसेवक), तर रेस्क्यूचे  देवेंद्र भोसले, तेजस जाधव, अमोल चव्हाण, राकेश शिक्रे, सचिन निकम दाखल झाले. वनविभागाकडून विशेष मोहीम राबवून गव्याला अधिवासात घालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button