सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दारू तस्करी टोळीतील तिघांना ठोकल्या बेड्या | पुढारी

सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दारू तस्करी टोळीतील तिघांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा  गोवा बनावट दारूची तस्‍करी करणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील टाेळीतील मुख्य संशयितासह तिघांना राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने आज (दि. ३) पहाटे बेड्या ठोकल्या. संशयित आराेपींकडून १८ लाख २३००० किंमतीचा दारूसाठा आणि वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. राज्‍य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर पोलीस अधीक्षक रवींद्र आवळे आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करून या टोळीला जेरबंद केले.

वैजनाथ चनापसाप्पा गापुरे ढगापुरे (वय 35, रा. एकता नगर वालचंद कॉलेज जवळ सोलापूर ) अजय विलास लोंढे ( 29 रा. लक्ष्मीनगर उत्तर सोलापूर) अर्जुन रमेश कांबळे (वय 27 रा. मुळेगाव दक्षिण सोलापूर ) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.

माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये लग्नाचे साहित्य मंडप आणि गाद्यांमध्ये देशी विदेशी दारूचे 120 बॉक्स भरून आजरा-कोल्हापूर मार्गे सोलापूरकडे जात असताना पोलीस अधीक्षक रवींद्र आवळे आणि त्यांच्या पथकाने उजळवाडी येथील उड्डाणपुलाजवळ टेम्पोचा ताबा घेऊन तपासणी केली. यावेळी या टेम्‍पोमध्ये गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला.

हे ही वाचा : 

Back to top button