आजर्‍यात हत्तीकडून कारचा चुराडा | पुढारी

आजर्‍यात हत्तीकडून कारचा चुराडा

आजरा ; पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील कासारकांडगाव येथे शुक्रवारी पहाटे हत्तीने येथे एका कारचा चक्काचूर केला. दारात उभ्या असलेल्या कारवर हत्तीने सुमारे एक ते दीड तास धक्के मारून कारची मोडतोड केली.

कासारकांडगाव येथील नारायण सरदेसाई हे चंदगड मार्गावरील शेतामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी मुलीने कार लावली होती. सरदेसाई यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी ही कार आपल्या भावकीतील एका शेतात उभी केली होती.

शुक्रवारी पहाटे पाच वाजता हत्तीने या कारला धक्के मारले. सुमारे एक ते दीड तास हा हत्ती कारला चारही बाजूंनी धक्के देत होता. शेतामध्ये तीन ते चार ठिकाणी सुमारे 50 ते 60 फुटांच्या परिसरात त्याच्या खुणा आढळल्या आहेत. मात्र, यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

Back to top button