हातकणंगले तालुक्यात ड्रोनद्वारे फवारणीचा अनोखा उपक्रम | पुढारी

हातकणंगले तालुक्यात ड्रोनद्वारे फवारणीचा अनोखा उपक्रम

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा

पाडळी (ता. हातकणंगले ) येथील विनोद पाटील, दत्तात्रेय पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी केली आहे

” जय जवान, जय किसान” यानंतर आता जय विज्ञान या घोषवाक्याप्रमाणे शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. .

हातकणंगले येथील पाटील यांच्या उसावर तांबेरा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. ऊसाची उंची वाढल्याने पंपाद्वारे औषध फवारणी करणे शेतमजुरांच्या आरोग्यास धोकादायक होते.

या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंचलित ड्रोनद्वारे सहा मिनिटात एक एकरावर फवारणी केली. बॅटरीवर चालणारे हे ड्रॉन असून यामध्ये अत्याधुनिक जीपीएसप्रणाली आहे.

एकवेळ क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची आवश्यकता भासत नाही. पिकावर किडीचा प्रादुर्भाव किती आहे हे सुद्धा यातून कळते. यामुळे औषधांची मात्रा निश्चित करता येते. औषध अथवा बॅटरी मध्येच संपले तर पुन्हा त्याच ठिकाणाहून फवारणी होते.

अशा पद्धतीने पिकांवर फवारणी करणे हे हातकणंगले तालुक्यातील कृषी क्षेत्रात एक वेगळा उपक्रम ठरला आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button