कोल्हापूर : महाडिक कुटुंबीय भावुक | पुढारी

कोल्हापूर : महाडिक कुटुंबीय भावुक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेवरील चुरशीच्या विजयानंतर धनंजय महाडिक कोल्हापुरात येताच त्यांनी शिरोली येथे महादेवराव महाडिक यांची निवास्थानी भेट घेतली तसेच रुईकर कॉलनीतील निवासस्थानी आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हा सारेच भावुक झाले.

धनंजय महाडिक सर्वप्रथम चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी गेले. तेथे महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यांनी महादेवराव महाडिक यांचे आशीर्वाद घेऊन त्यांची गळाभेट घेतली. यावेळी दोघांनाही आनंदाश्रू रोखता आले नाहीत. यावेळी महादेवराव महाडिक यांनी ही आमच्या ताकदीची सुरुवात असल्याचे सांगितले. यावेळी शौमिका महाडिक, अमल महाडिक, स्वरूप महाडिक उपस्थित होते.

पोलिसांसोबत वादावादी

ताराराणी चौकात जल्लोष सुरू असताना एका कार्यकर्त्याची पोलिसांसोबत वादावादी झाली. त्याला चौकीत नेताच इतर कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली. यामुळे तणावाचे वातावरण बनले होते. दसरा चौकातही असाच प्रकार घडला.

Back to top button