पन्हाळगडावर मुसळधार | पुढारी

पन्हाळगडावर मुसळधार

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे येथील मुख्य रस्त्यावर पाण्याचे लोट वाहताना दिसले. पहिल्याच पावसात नव्या जिओ ग्रेड तंत्रज्ञान विकसित करून बांधकाम केलेल्या रस्त्याच्या मधून धबधबासद़ृश पाण्याचे लोट वाहिले. त्यामुळे खाली पडणारे पाणी मंगळवार पेठ येथे काही घरातही शिरले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. मंगळवार पेठ व नेबापूर येथील सरपंच व ग्रामस्थांबरोबर चर्चा करूनच पाण्याची निर्गत करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही करावे लागत असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाईल. मात्र, जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायतीने काही तरतूद करून घेणे आवश्यक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग पन्हाळा उपअभियंता धनंजय भोसले यांनी सांगितले.

Back to top button