वृक्षारोपणाने पन्हाळगडावर स्वातंत्र्य दिन साजरा | पुढारी

वृक्षारोपणाने पन्हाळगडावर स्वातंत्र्य दिन साजरा

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन:  हिरवा गार निसर्ग…धुक्याची हजेरी अन् पावसाची रिमझिम…अशा वातावरणात आज रविवारी सकाळी ऐतिहासिक पन्हाळगडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

झाडांचं शतक, शतकांसाठीची झाडं… हे ब्रीद घेऊन निसर्ग संदेश देण्यात आला. शंभर झाडं लावून त्याच्यामध्ये तिरंगा रोवून राष्ट्रगीत म्हणून मानवंदना देण्यात आली. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

सह्याद्री देवराई, शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र, पन्हाळा नगरपालिका, स्मार्ट वर्ल्ड ग्रुप, मदत फौंडेशन, कंपनी सेक्रेटरी असोसिएशन ऑफ इंडिया, गुरू गोरक्षनाथ गोशाळा संस्थेच्या वतीने आयोजित अनोख्या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

संजीवन पब्लिक स्कूलचे चेअरमन पी.आर. भोसले, नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, नगरसेविका तेजस्विनी गुरव, मुख्याधिकारी स्वरूप घारगे, कंपनी सेक्रेटरी अमित पाटील, शिवराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, राजेंद्र पोवार, मोहन खोत, संदीप साळोखे, नंदकुमार वाली, मकरंद सूर्यवंशी, विक्रांत भागोजी यांच्यासह स्मार्ट वर्ल्ड ग्रुपचे सदस्य अॅड. अमित बडकर, राजेश करंदीकर, सचिन ओसवाल, रोहित खंडेलवाल, राहुल गांधी, चेतन ओसवाल, महेश मलाणी, आकाश कोरगावकर, देविचंद ओसवाल, ऋषभ ओसवाल आदी उपस्थित होते.

यावेळी आंबा, चिंच, पेरू, फणस, बहावा, काटेसावर, सप्तपर्णी, आवळा, करंजी ही आदी देशी झाडे लावण्यात आली.

Back to top button