उत्कंठा.. हुरहुर अन् उत्साह! | पुढारी

उत्कंठा.. हुरहुर अन् उत्साह!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. एक वर्षानंतर झालेल्या ऑफलाईन परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. बर्‍याच दिवसांनंतर विद्यार्थ्यांमध्ये बारावीच्या निकालाची उत्कंठा.. हुरहुर.. उत्साह पाहायला मिळाला. कोरोनामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. यावर्षीचा बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालकांनी नेट कॅफेवर गर्दी केली होती. निकाल पाहिल्यानंतर चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मित्रांसमवेत जल्लोष केला. उत्तीर्ण झाल्याचा आनंद पेढे वाटून साजरा केला. काहीजणांनी आई-वडील, शिक्षक, नातेवाईक यांचे आशीर्वाद घेतले. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले.

विवेकानंद कॉलेज विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गेल्या 30 वर्षांच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत अव्व्ल ठरले आहे. विज्ञान शाखेत श्रावणी पाटील 94.83 गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. वैष्णवी सावंत हिने 93.83 गुणांनी द्वितीय, सुखदा पाटीलने 93.17 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत ऐश्‍वर्या परांजपे 94.67 (प्रथम), शेख मुदस्सर एम. 94.33 (द्वितीय), ओजस दणाणे याने 93.67 टक्के गुण (तृतीय) क्रमांक मिळविला. कला शाखेत वैभवी घाटगेने 87.50 व नेहा लवटे हिने 87.50 गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला. ओंकार चेचरने 85.17 व शारगंधा मगदूम हिने 85.17 (द्वितीय), भाग्यश्री खांडेकर हिने 84.17 गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेचा निकाल 99.33, वाणिज्य शाखेचा 98.70, तर कला शाखेचा निकाल 81.02 टक्के लागला. गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. 765 पैकी 765 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कामर्स विभागाची विद्यार्थी निशा ओसवाल 94.83 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.

विज्ञान शाखेचा विद्यार्थी आयुष कदम याने 92.67 टक्के गुण मिळविले. सानिका सुतार (88.83), सोहम फडके (87.50) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत निशा ओसवाल (प्रथम), कीर्ती जयसिंघांनी (94.33-द्वितीय), खुशी राम्मिया (91.83-तृतीय) यांनी यश मिळवले. स. म लोहिया हायस्कूल व ज्?यु. कॉलेज स. म लोहिया हायस्?कूल व ज्?युनि. कॉलेजचा बारावी परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्?के लागला वाणिज्?य शाखा 99.87 टक्?के, तर कला शाखेचा निकाल 99. 44 टक्?के इतका लागला आहे. महाराष्ट्र हायस्?कूल व ज्?यु. कॉलेज श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्?कूल व ज्?युनि. कॉलेजच्?या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. कॉलेजच्?या विज्ञान, वाणिज्?य आणि कला शाखेचा निकाल 94. 29 टक्?के लागला.

एचएसव्?हीसी शाखेचा निकाल 99. 06 टक्?के लागला आहे. कॉलेजमधील कला, वाणिज्?य, विज्ञान व एचएसव्?हीसी या शाखांतील गुणानुक्रमे प्रथम आलेले विद्यार्थी असे ः सादिया जमादार (74 टक्?के), नंदिनी पाटील (86.17 टक्?के), विघ्नेश दिंडे (80.33 टक्?के), ऋषीकेश सुतार (71 टक्?के ). प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्?कूल व ज्?यु. कॉलेजच्या कला आणि वाणिज्?य शाखेचा निकाल 100 टक्?के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 97. 34 टक्?के लागला. महावीर महाविद्यालय महावीर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 77.60 टक्के लागला. 652 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 513 पास झाले. 139 विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल 99.57 टक्के, वाणिज्य शाखेचा 70.47, तर कला शाखेचा 62.74 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत ऋचिता पोतदार (93.67), आनंद जोशी (87.17), सिद्धी दिंडे (82 टक्के), वाणिज्य शाखा ः रोहिणी सावंत (74.17 ), अभंग कुंभार (68. 67), साक्षी कोळी (68 टक्के), कला शाखा ः समर्थ खैरमोडे (78. 17), शुभांगी झोरे (71), तर अनिल पाटील (70 टक्के ) गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

Back to top button