पन्हाळा गडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन... नागरिकांची गर्दी | पुढारी

पन्हाळा गडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन... नागरिकांची गर्दी

पन्हाळा ः पुढारी वृतसेवा पन्हाळा गडाच्या रेडिघाटी जवळील जंगलात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.

लता मंगेशकर बंगल्याच्या खालील बाजूस हा बिबट्या एका दगडी शिळेवर पहुडला असल्याचे पन्हाळा गडावरील उत्तम दळवी, अभिजित गायकवाड व राजू बुरुड या तिघांनी पाहिले व पन्हाळ्यातील सर्पमित्र व फोटो ग्राफर धीरज कुराडे यांना बोलावले, धीरज कुराडे यांनी हा बिबट्या आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे.

हा बिबट्या दहा मिनिटे दगडावर होता; मात्र तटबंदीवर बिबट्या पाहणार्‍यांचा दंगा वाढत गेल्याने हा बिबट्या जंगलात निघून गेला.

बिबट्या आल्याची वार्ता गावात समजताच बघ्यानी गर्दी केली होती. पन्हाळ्यात बर्‍याच दिवस नंतर बिबट्याचे दर्शन झाल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे;

मात्र सध्या पन्हाळ्यातील जनतेला निकमवाडी रस्त्याने प्रवास करावा लागत असून रस्त्यावर असणार्‍या जंगलातच आज बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button