शिवसेना नेते संजय राऊत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘इंदिरा निवास’ या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रबोधनकार ठाकरे आणि ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विद्यमान संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींची देवाण-घेवाण झाली. त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर दौर्‍यात ‘पुढारी’ पेपर्सचे चेअरमन व ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेची आठवण निघाली. ठाकरे आणि जाधव घराण्याचे ऋणानुबंध तीन पिढ्यांत घट्टपणे रुजले आहे, याची आठवण डॉ. जाधव आणि राऊत यांनी आवर्जून करून दिली.

सद्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती तसेच कोरोनानंतरच्या काळात असलेल्या आव्हानांचा मुकाबला या विषयावरही उभयतांनी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.

Exit mobile version