शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवारच! संजय राऊतांची घोषणा | पुढारी

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवारच! संजय राऊतांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (दि. २४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केली. दरम्यान, संजय पवार यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरात मोठा जल्लोष केला.

शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, या अटीवर शिवसेना ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला होता. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओ‍ळखले जातात. त्यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तु‍‍ळात आहे.

Back to top button