पवारांवरील टीका खपवून घेणार नाही : हसन मुश्रीफ | पुढारी

पवारांवरील टीका खपवून घेणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांचे कौतुक करणारे राज ठाकरे आता त्यांच्यावर टीका करत आहेत. यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी हेतू दडलेला असावा, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ठाकरेंना लगावला. त्यांच्याकडून वारंवार पवार यांच्यावर सुरू असलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशाराही रविवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, त्यांच्या पुर्वीच्या बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात खूप फरक पडला आहे. त्यांच्या सभांना आता लोकांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे ठाकरेंच्यादेखील लक्षात आले आहे. महापूरबाधित होणार्‍या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 

Back to top button