‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीतून प्रबोधन | पुढारी

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीतून प्रबोधन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पर्यावरणाचे जतन करा, पृथ्वी वाचवा, पाणी वाचवा, माती वाचवा यासह स्त्री शिक्षण, विश्‍वशांती यासह विविध प्रकारच्या जनजागृतीच्या फलकांसह लोकप्रबोधनाची पत्रकारिता करणारे ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अमर रहे… अशा घोषणा देत भर पावसात स्मृतिज्योत स्केटिंग रॅली काढण्यात आली.

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हा स्केटिंग असोसिएशन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण वर्ग आणि पंचगंगा विहार व नारायणी स्केटिंग वर्ग, बोंद्रेनगर यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी रॅलीची सुरुवात नागाळा पार्क येथील इंदिरा निवास येथून ‘दै. पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या उपस्थितीत झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली सकाळी साडेदहा वाजता, भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथे पोहोचल्यानंतर पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादनाने रॅलीची सांगता झाली. तत्पूर्वी रॅलीचे स्वागत ‘दै.पुढारी’ मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अशोक भंडारी, स्केटिंग प्रशिक्षकमहेश कदम आदी उपस्थित होते.

रॅलीत इशिका डावरे, लायशा बेंडकाळ, आर्यवीर पाटील, प्रेरणा भोसले, आदिती रेवणकर, शौर्य कामत, शौर्य इंगवले, नाज सय्यद, क्षितिज शिंदे, तनिष्का रेळेकर, तनीषा मुजूमदार, सौख्यशील सरदेसाई, सायली गायकवाड, देवेंद्र कदम, ओम पुरेकर, सई गायकवाड, हर्षवर्धन जगताप, वीरश्री कदम, हर्षद कुंभार, ओम जगताप, अनुष्का रोकडे, अर्णव रोकडे, हर्षल पाटील, योगेश्‍वरी पाटील, बुर्‍हानुद्दीन भोरी, विराज पाटील, अर्जुन जबडे, साईशा चौगले, फईम सय्यद, हर्षदा जगताप, यश कांबळे, शुभम मोहिते यांचा सहभाग होता.
पालक अ‍ॅड. भारती डावरे, चेतन डावरे, युवराज जबडे, सकिना भोरी, धनवर्षा पाटील, नीलम गायकवाड, राजकिशोर गायकवाड, प्रियाराणी रोकडे, प्रकाश पुरेकर, मेघशाम जगताप, वर्षा पुरेकर, दीपाली पाटील, आकाश बेंडकाळे, मानसी बेंडकाळे, अश्‍विनी बेंडकाळे यांनी प्रोत्साहन दिले. संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, विक्रमवीर स्केटिंगपटू अ‍ॅड. धनश्री कदम, तेजस्विनी कदम, प्रेरणा भोसले, ऐश्‍वर्या बिरंजे आदींनी केले.

Back to top button