कोल्हापूरचा पारा ७ अंशांनी घसरला | पुढारी

कोल्हापूरचा पारा ७ अंशांनी घसरला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी अन् हवेत गारवा, असे चित्र होते. यामुळे तापमानाचा पारा शुक्रवारी तब्बल 7 अंशांनी घसरून 29 अंशांवर स्थिरावला. ‘असनी’ चक्रीवादळामुळे कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात तापमानात कमालीचा चढ-उतार पाहायला मिळला. रविवारी (दि. 8) तापमानाने उच्चांक गाठला होता. तेव्हा हा पारा तब्बल 40.3 अंशांवर पोहोचला होता. मात्र, ‘असनी’ चक्रीवादळामुळे बुधवारी (दि. 11) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

पुढील आठवडाभर पारा 30 ते 37 अंशांदरम्यान राहणार असून, काही दिवस पावसाच्या हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता आहे.

Back to top button