कोल्‍हापूर : शिरटीत आढळले ४० किलो वजनाचे कासव

शिरटी; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील शिरटी-शिरोळ मार्गावर राजकुमार कोगनोळे यांच्या शेतीलगत ४० किलो वजनाचे कासव आढळले.

या कासवाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. दरम्यान येथील प्राणीमित्र रोहित कांबळे, तुषार कांबळे, प्रतीक कांबळे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कासवाला ताब्यात घेऊन वन विभागाच्या स्वाधीन केले.

त्यानंतर त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान कासव रस्त्यावर पडले होते.

त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी तात्काळ येथील प्राणीमित्र रोहित कांबळे यांच्यासह टीमला बोलावून घेतले.

त्यांनी व्यवस्थित कासवाला ताब्यात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वाईल्ड लाईफ कॉझर्व्हेशन रेस्क्यू सोसायटीमार्फत हे कासव वनविभागाच्या ताब्यात दिले.

वनविभागाचे अधिकारी गजानन सकट, शुभम रास्ते, दिलीप कांबळे, शाहरुख मुजावर, रामदास भंडारे, सागर पवार, शुभम कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

Back to top button