कोल्हापूर : ऑनलाईन बुकिंग केलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना उद्या लस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांचे महापालिकेच्या विविध ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात व कदमवाडीतील द्वारकानाथ कपूर दवाखान्यात लसीकरण करण्यात येणार आहे.

गुरूवारी (दि. ५) सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत हे लसीकरण होईल. ऑनलाईन बुकिंग केले आहे अशाच नागरीकांचे कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे लसीकरण केले जाणार आहे.

तसेच विक्रमनगर येथील भगवान महावीर दवाखाना येथे 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले आहेत अशा नागरीकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button