विद्यार्थ्यांचे कथाकथनातून लोकराजास अभिवादन | पुढारी

विद्यार्थ्यांचे कथाकथनातून लोकराजास अभिवादन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वाअंतर्गत मंगळवारी शालेय स्तरावरील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कथाकथनातून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले.

राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यास उजाळा देऊन अभिवादन करण्यासाठी स्मृती शताब्दी पर्वाअंतर्गत मंगळवारी शालेय स्तरावर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगावर आधारित कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील 1 हजार 967 शाळांमधील 1 लाख 14 हजार 491 विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धेत आजरा तालुक्यातील 72 शाळांतील 7 हजार 924 विद्यार्थी, भुदरगडच्या 81 शाळांतील 556 विद्यार्थी, चंदगडमधील 143 शाळांतील 4 हजार 265 विद्यार्थी, गडहिंग्लजच्या 103 शाळांतील 431 विद्यार्थी, गगनबावडामधील 22 शाळांतील 422 विद्यार्थी, हातकणंगलेतील 362 शाळांतील 13 हजार 254 विद्यार्थी, कागलमधील 249 शाळांतील 44 हजार 367 विद्यार्थी, करवीरच्या 306 शाळांतील 4 हजार 310 विद्यार्थी, पन्हाळयातील 113 शाळेतील 10 हजार 432 विद्यार्थी, राधानगरी तालुक्यातील 74 शाळांतील 709 विद्यार्थी, शाहूवाडीमधील 112 शाळांतील 224 विद्यार्थी, शिरोळच्या 157 शाळांतील 1 हजार 225 विद्यार्थी आणि कोल्हापूर महापालिकेच्या 173 शाळांतील 27 हजार 372 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Back to top button