अ‍ॅड. सदावर्तेंना आज कोर्टात हजर करणार | पुढारी

अ‍ॅड. सदावर्तेंना आज कोर्टात हजर करणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारे वक्‍तव्य केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदावर्ते यांना बुधवारी मुंबई येथील कारागृहातून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी त्यांना दि. 25 पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे.

Back to top button