Kolhapur : डॉ. मेघना कामत यांनी मण्यांतून साकारली अनोखी कलाकृती | पुढारी

Kolhapur : डॉ. मेघना कामत यांनी मण्यांतून साकारली अनोखी कलाकृती

कोल्हापूर; पुढारी वत्तसेवा :

मणी ओवून साकारल्या जाणार्‍या कलेला मोठा वारसा आहे. मात्र, कालौघात हा वारसा हरवला आहे. अशातच कोल्हापूरच्या डॉ. मेघना कामत यांनी हा वारसा जपला असून, या कलेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमुद्रा व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. डॉ. मेघना यांनी साकारलेले कौशल्य राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व चित्र प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. रविवारी (दि.24) पासून शाहू मिल्सच्या दालनात सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले होणार आहे.

दिवसातून 12 तास सलग काम करावे लागले. एक कलाकृती पूर्ण होण्यास साधारण 40 दिवस लागतात. क्षणभर मणी ओवणे सोपे वाटते. मात्र, त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना साकारणे तसेच साकारताना फिकट मणी ओवून त्यात जिवंतपणा आणणे हे केवळ कौशल्यच आहे.

Back to top button