कोल्हापूर जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात यावर्षी भूजल पातळीत वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी ही अधिक वाढ आहे. गेल्यावर्षी डिसेंबरपर्यंत झालेल्या पावसाने भूजल पातळी वाढण्यास चांगली मदत झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे अशा वर्षातून चारवेळा भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. पावसाळा संपत असताना सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या नोंदीवर जिल्ह्यातील तालुक्यांतील टंचाईचे स्वरूप निश्चित केले जाते.

जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून 99 निरीक्षण विहिरींद्वारे भूजल पातळी मोजली जाते. त्याशिवाय 865 विहिरींचे त्या गावात नेमलेल्या जल सुरक्षकांकडून निरीक्षण घेतले जाते. यावर्षी 99 विहिरींच्या मार्चअखेर निरीक्षणाद्वारे जिल्ह्यातील स्थिर भूजल पाणी पातळी 4.24 मीटर इतकी आहे. याच कालावधीतील 2017 ते 2021 या गेल्या पाच वर्षांत सरासरी भूजल पाणी पातळी 4.37 मीटर इतकी होती.

यावर्षी पाणी पातळीत 0.13 मीटर इतकी वाढ झाली आहे. ही पातळी जमिनीच्या पृष्ठभागापासून मोजली जाते. त्यामुळे जितके अंतर कमी तितकी भूजल पातळीत वाढ हे सूत्र आहे.सर्वाधिक पाऊस पडणार्‍या गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यांत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी भूजल पातळीत एक मीटरपेक्षा कमी अशी घट झाली. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 0.44 मीटर इतकी भूजल पातळी वाढली आहे. कोल्हापूर शहराचा समावेश असलेल्या करवीर तालुक्यातील भूजल पातळीत अवघी 0.01 इतकी वाढ आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी सरासरी भूजल पातळीत चांगली वाढ आहे. गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यांत भूजल पातळीत घट झाली असली, तरी ती फारशी नसल्याने चिंतेचा विषय नाही. ही घट नगण्य आहे.
– राहुल खंदारे, कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोल्हापूर

जास्त पर्जन्यमानात
50 टक्के घट

पर्जन्यमानातील घट भूजल पातळी उपाययोजना कधी सुरू
सर्वसामान्य पर्जन्यमानात 20 टक्के घट 3 मीटरपेक्षा जास्त ऑक्टोबरपासून
2 ते 3 मीटरपर्यंत जानेवारीपासून
0 ते 1 मीटरपर्यंत एप्रिल
जास्त पर्जन्यमानात
50 टक्के घट 2 ते 3 मीटरपर्यंत जानेवारी
1 ते 2 मीटरपर्यंत एप्रिल

जिल्ह्यातील मार्चअखेर भूजल पातळी

तालुका निरीक्षण विहिरी   मार्च 2017 ते 2021 मधील सरासरी पातळी   मार्च 2022 मधील स्थिर पातळी   सरासरी पातळीत वाढ
आजरा 8  3.79  3.55  0.24
भुदरगड 11  4.22  4.14  0.08
चंदगड 11  8.07  7.83  0.24
गडहिंग्लज 8 3.96 3.52 0.44
गगनबावडा 2 6.05 6.10 -0.05
हातकणंगले 12 4.75 4.68 0.07
कागल 5 1.96 1.68 0.28
करवीर 9 3.57 3.56 0.01
पन्हाळा 10 3.67 3.71 -0.04
राधानगरी 8 2.74 2.70 0.04
शाहूवाडी 5 5.08 4.90 0.18
शिरोळ 10 4.56 4.51 0.05
एकूण 99 4.37 4.24 0.13

Back to top button