गारगोटी : पोलीस असल्याची बतावणी करून वृध्देच्या दोन लाखांच्या बांगड्या केल्‍या लंपास | पुढारी

गारगोटी : पोलीस असल्याची बतावणी करून वृध्देच्या दोन लाखांच्या बांगड्या केल्‍या लंपास

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : गारगोटी बसस्थानकासमोर पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेच्या चार तोळ्याच्या सुमारे दोन लाख रूपयांच्या बांगड्या लंपास केल्‍या. ही घटना गुरूवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई कॉलनीतील शोभा मारूती सावंत या वृद्ध महिला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरला जाण्यासाठी बसस्थानवर जात होत्या. यावेळी गारगोटी कोल्हापूर रोडवर भारत बेकरी समोर चोरट्यांनी या वृद्धेस आपण साद्या वेशातील पोलीस असुन पुढे चेकींग चालु आहे. त्यामुळे आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. असे सांगून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून नकली पाटल्या पिशवीत ठेवून पोबारा केला. बसस्थानकात गेल्यानंतर वृध्देने आपल्या पाटल्या हातात घालण्यासाठी पाहिल्या असता त्या नकली असल्याचे निदर्शनास आले. त्‍यानंतर त्‍यांनी पोलिसात धाव घेतली.

Back to top button