जादा परताव्याच्या नावाखाली 35 लाखांची फसवणूक | पुढारी

जादा परताव्याच्या नावाखाली 35 लाखांची फसवणूक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : आकर्षक व जादा परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 34 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिजित धोंडिबा सावंत (रा. हॉकी स्टेडियम परिसर) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभ ट्रेड या कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली हा प्रकार झाल्याची फिर्याद रमेश रावजी निर्मळे (रा. शिरोळ) यांनी दिली आहे.

ताराबाई पार्क येथील क्रिस्टल प्लाझा येथे अभिजित सावंत याने शुभ ट्रेड नावाची कंपनी सुरू केली होती. यामध्ये गुंतवणुकीवर 5.4 टक्के परतावा व एक वर्षानंतर मुद्दल परत करण्याचे आमिष दाखवले होते.

फिर्यादी रमेश निर्मळे व इतरांनी गुंतवलेल्या 46 लाख रुपयांच्या रकमेपैकी सुरुवातीला काही परतावा देण्यात आला. उर्वरित 34 लाख 98 हजारांची रक्कम परत करण्यास सावंत टाळाटाळ करू लागल्याने निर्मळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.

Back to top button