मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानळावर आगमन, शिरोळला रवाना - पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानळावर आगमन, शिरोळला रवाना

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानळावर आगमन झाले. कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यातील पूरबाधित भागाची पाहणी करणार आहेत.

विमानतळावरुन ते मोटारीने शिरोळला रवाना झाले. नंतर सव्वाअकरा वाजण्याचा सुमारास शिरोळ व नृसिंहवाडी येथील पूरबाधित भागाची पाहणी करणार आहेत.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, खासदार धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आ. ऋतूराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर ,जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानळावर आगमन

दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

1.15 वाजता गंगावेस ते पंचगंगा हॉस्पिटल परिसराची पाहणी व नंतर शिवाजी पूल येथून पूरग्रस्त भागाची माहिती घेणार आहेत.

दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीचा आढावा ते घेतील.

त्यानंतर पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता ते मुंबईला रवाना होतील.

हे ही वाचा :

Back to top button