पुण्यात घर घेण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारले | पुढारी

पुण्यात घर घेण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात घर घ्यावे असे कोल्हापूरकरांचे स्वप्न दै. ‘पुढारी’ पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’च्या माध्यमातून साकारले आहे. प्रदर्शनात रविवारी सुट्टीच्या दिवशी हजेरी लावत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी नवीन फ्लॅटचे बुकिंग केले.

दै. ‘पुढारी’च्या वतीने हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. आयकॉन स्टील प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. मगरपट्टा सिटी ग्रुप, कोलते-पाटील डेव्हलपर्स, रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सुमेरू समूह, स्टारगेज प्रॉपर्टीज, साम—ाज्य रियालटी, जयवंत ग्रुप, वेस्ट वूड इस्टेट या नामांकित संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. पुण्यातील वडगाव, नर्‍हे, कात्रज, धायरी, बारामती रोड, खेड शिवापूर, वाघोली, नांदेड सिटी, खराडी, हिंजवडी, कोंढवा, ताथवडे, सोमाटणेसह पुण्यातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्प प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध होते.

प्रदर्शनात रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्राहकांनी गृहप्रकल्पांच्या स्टॉलला भेट दिली. पुण्यातील नामांकित बिल्डर्स व त्यांच्या महत्त्वाकांक्षी वास्तू प्रकल्पाबद्दल माहिती घेतली. काही इच्छुक ग्राहकांनी पुण्यात येऊन प्रत्यक्ष गृह प्रकल्प पाहण्याची यावेळी इच्छा व्यक्त केली. कोरोनामुळे दोन वर्षे स्वप्नातील घर शोधताना ग्राहकांना अडचणी आल्या.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील गृहप्रकल्पांची एकाच छताखाली संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळाली. बांधकाम व्यावसायिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सुमेरू समूहाच्या देवेश्वर टेकडी येथील वास्तू प्रकल्पातील वन बीएचके फ्लॅटचे यावेळी सिद्धेश्वर लोखंडे या ग्राहकाने बुकिंग केले.

पुण्यात जाऊन फ्लॅट पाहण्यापेक्षा कोल्हापुरात दै.‘पुढारी’ने भरविलेल्या वास्तू प्रकल्प प्रदर्शनात नवीन घरे पाहता आली. नामांकित बिल्डर्स व संस्थेचे वास्तू प्रकल्प पाहून त्यातून चांगल्या घराची निवड करता आली याचे समाधान आहे.
– सिद्धेश्वर लोखंडे, ग्राहक

Back to top button