कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे दोन रुग्ण | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे दोन रुग्ण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे दोन रुग्ण सापडले. कोल्हापूर शहर, इचलकरंजी येथील प्रत्येकी एकाचा यात समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही, ही आरोग्य विभागासाठी दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यात एकूण सहा सक्रिय रुग्ण असून, ते वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली घरीच उपचार घेत आहेत. शासकीय प्रयोगशाळेत 150, तर खासगी प्रयोगशाळेत 56 जणांचे नमुने तपासण्यात आले.

Back to top button