पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांचा महापूर | पुढारी

पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांचा महापूर

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

शुक्रवारपासून दै. ‘पुढारी’च्या शॉपिंग व फूड फेस्टिव्हलला सुरुवात झाल्यानंतर लोकांनी प्रचंड प्रतिसाद देत तोबा गर्दी केली होती. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असताना अचानक वळीव पावसाने तुफान हजेरी लावली.

सुमारे तासभर बाहेर पाऊस सुरू असताना लोकांनी मात्र आतमध्ये खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. पावसाच्या उसंतीनंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये पुन्हा लोकांचे लोंढेच्या लोंढे फेस्टिव्हलकडून वळल्याने या ठिकाणी लोकांचा महापूरच आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या ठिकाणच्या अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये तर पावसानंतरच्या आल्हाददायी वातावरणात बालचमूंसह कुटुंबीयांनी भरपूर आनंद घेतला.
सायंकाळी प्रल्हाद-विक्रम प्रस्तूत रॉकिंग हिट्स बीट्सने एकाहून एक सरस गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या प्रदशर्नात विविध कंपन्यांच्या कार, अत्याधुनिक दुचाकी, विविध शिक्षण संस्थांचे माहिती दर्शक स्टॉल, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, मसाले यासह भरपूर वस्तूंचा खजिना ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. गडहिंग्लज उपविभागात सर्वात मोठा असा फेस्टिव्हल असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे. याशिवाय फूड स्टॉल्समध्ये अनेक दर्जेदार पदार्थ उपलब्ध असल्याने याचाही पुरेपूर आस्वाद नागरिकांकडून घेतला जात आहे. या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक अर्जुन ऑईल हे आहेत. शिवराज कॉलेज मैदान, शासकीय विश्रामगृहाशेजारी, कडगाव रोड गडहिंग्लज येथे दि. 29 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे.

आज बॉलीवूड डान्स…

फेस्टिव्हलमध्ये आलेल्या ग्राहकांचे निखळ मनोरंजन व्हावे यासाठी आज (दि.27) बॉलीवूड गीतांवर आधारित नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डी-मेकर गु—पच्या वतीने सायंकाळी 5.30 वा. हा कार्यक्रम पार पडणार आहे. याशिवाय नामवंत व्यक्ती, मान्यवरही यांच्याकडून फेस्टिव्हलला भेट दिली जाणार आहे.

आज विशेष सवलत

वीकेंडच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी गृहीत धरून सर्व स्टॉलधारकांसह अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये रविवारी (दि. 27) येणार्‍या ग्राहकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्टॉलधारकांकडून केले आहे.

Back to top button