सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गासह ९ मार्ग बंद | पुढारी

सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गासह ९ मार्ग बंद

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे ४ वाजता पाण्याखाली गेला आहे.

याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा व राज्य ८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त गावात आता साहित्याची बांधाबांध सुरू आहे.

सद्या कृष्णा नदीच्या पाण्यामुळे उदगाव येथील मोठ्या ओढ्यावर असलेल्या सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे.

बायपासवरील सर्व वाहतूक उदगांव गावातून सोडण्यात आली आहे.

उदगांव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशनरस्ता बंद

उदगांव-जयसिंगपूर रेल्वे स्टेशनरस्ताही पहाटे बंद झाला आहे.

वारणा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे दानोळी-कोथळी, दानोळी- कवठेसार मार्ग बंद झाला असून कवठेसार गावाचा संपर्क तुटला आहे.

कवठेसार गावातील ५८ कुटुंबे स्थलांतरीत केली आहेत. २५३ जनावरांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे नांदणी-शिरढोण, नांदणी-धरणगुत्ती व नांदणी-कुरुंदवाड मार्ग बंद झाला आहे.

हेरवाड-अब्दुललाट, शिरढोण-कुरुंदवाड हे देखील मार्ग पाण्याखाली गेले आहे.

कृष्णाचे पाणी ४१ फूट , पंचगंगा ५४.६ इतके पाणी शुक्रवारी मध्यरात्रीतून वाढले आहे.

या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी; वाहतूक पूर्णत: बंद

कसबा बावडा-शिये रस्ता बंद

मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी

बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला

मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद

उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी

कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद

करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली

करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद

निलजी, ऐनापूर बंधार्‍यावर पाणी; वाहतूक बंद

मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी

गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद

कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली

गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद

मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,

निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू

सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली

सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू

बस्तवडे ते आणूर बंधार्‍यावर पाणी

पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू

कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्‍यांवर पाणी

महे ते बीड मार्गावर पाणी; वाहतूक बंद

पहा फोटोज : 

 

Back to top button