कोल्‍हापूर : गौण खनिज लुटीचा वीकेंड फंडा; सुट्टीच्या दिवशी होते बेकायदेशीर उत्खनन, वाहतूक | पुढारी

कोल्‍हापूर : गौण खनिज लुटीचा वीकेंड फंडा; सुट्टीच्या दिवशी होते बेकायदेशीर उत्खनन, वाहतूक

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात शेतजमीन सपाटीकरणाच्या नावावर डोंगर पोखरणारे काही कंत्राटदार, रॉयल्टी बुडवून गौण खनिज काढणारे गौण खनिज चोरीसाठी अजब फंडा वापरत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी-रविवारी शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन शनिवारी रात्री आणि रविवारी दिवस-रात्र मुरूम, दगड, गौण खनिज लुटीचा नवीन विकेंड फंडा काहीजनांनी काढल्याचे निदर्शनास येत आहे.

जमिनीतील गौण खनिज काढण्यासाठी शासनाच्या विविध विभागाचे परवाने काढणे आवश्यक आहे. तर शासनाला रॉयल्टीची रक्कम भरावी लागते. तसेच वाहतूक करताना दिलेल्या नियमातच करावी लागते. या सर्वांना तिलांजली देत. शासनाचा महसूल बुडवत अनेकजण गौण खनिज उत्खनन करतात.

कारवायांपासून वाचण्यासाठी शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन रात्री जेसीबीच्या साह्याने डंपर व ट्रॅक्टर मधून वाहतूक करतात. हा फंडा हातकलंगले आणि करवीर तालुक्यातील काही गावातील डोंगर भागातून होत आहे. कारवायांचे अधिकार आता राज्य शासनाने महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सुद्धा दिले आहेत. पण चिरीमिरीसाठी काही अधिकारी त्यांना अभय देत असल्याचे नागरिकांच्यांतून चर्चा आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button