NDRF ची टीम पुण्यातून कोल्हापूरकडे रवाना, पंचगंगा इशारा पातळीकडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी NDRF टीम काही तासांत दाखल होणार आहे. NDRF च्या दोन टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

आज सकाळी ७ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी ३५ फूट ७ इंच इतकी झाली असून तिची वाटचाल इशारा पातळीकडे होत आहे.

पावसाचा जोर असाच राहिल्यास दुपारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यापैकी एक टीम कोल्हापूर शहरात तर एक शिरोळमध्ये तैनात राहणार आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा हा राज्यमार्ग तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे.

रत्नागिरी महामार्ग बंद झाल्याने कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर पकडला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम होता.
धरणक्षेत्रात दमदार पाऊस आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
सकाळी आठ वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी ३५ फूट ११ इंच इतकी होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुटावर आहे.
Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button