कोल्हापूर : बिबट्याकडून कुत्र्याचा फडशा

आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील आवंडी क्रमांक एकवरील बयाजी मिसाळ यांच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आवंडी धनगरवाडा हा जंगल क्षेत्राला लागून आहे. या ठिकाणी सातत्याने जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे मिसाळ यांनी संरक्षणासाठी कुत्रा पाळला होता. तो दारात बांधलेला होता. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मिसाळ यांना कुत्र्याच्या भूकंण्याचा आवाज आला. ते जागे होऊन घरातून बाहेर आले. तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याची शिकार केली होती. त्यानंतर बिबट्याने कुत्र्यासह जंगलात पळ काढला.

Exit mobile version